HI FRIENDS YOUR MOST WELCOME TO ROHIT BHAMARE`S GALLERY, Now Open Your Happiness!!

Todays Good Thought of the Gallery

"The real art of conversation is not only to say the right thing at the right time, but also to leave unsaid the wrong thing at the tempting moment"

Friday, 24 February 2012

फ्रांसचा शूर योध्दा व सम्राट

नेपोलियन बोनापार्ट
 
नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक
नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर तो फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली त्याचे इटलि ऑस्ट्रिया मधील मोहिमांमुळे तो लवकरच कर्तुत्ववान अधिकारी बनला व फ्रेंच राज्यक्रांति पर्यंत त्याने सरसेनापती पद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रांन्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधिल बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले.
१८१२ मध्ये रशिया मधील हस्तक्षेप नेपोलियनच्या पथ्यावर पडला. त्याचे रशियामध्ये नेलेल्या सैन्यापैकि पाव सैन्यदेखिल तो परत आले नाहि. नेपोलियन चे साम्राज्य कमकुवत झालेले पाहुन ६व्या आघाडिने नेपोलियनच्या सैन्याचा लेप्झिग येथे पराभव केला व फ्रान्स वर आक्रमण केले. नेपोलियन ला सम्राटपदावरुन पायउतार व्हावे लागले त्याला एल्बा येथे नेपोलियनला स्थानबद्ध ठेवण्यात आले. मार्च १८१५ मध्ये नेपोलियन एल्बामधुन सुटुन पुन्हा पॅरिस मध्ये आला व अल्पावधीतच आपले पुर्वीचे सैन्य पुन्हा एकत्र केले व पुन्हा जुन्या शत्रुंविरुद्ध आघाडी उघडली. ब्रिटन नेदरलंड व प्रशिया ने पण प्रत्युतर म्हणून आघाडी उघडली या आघाडीचे नेतृत्व नेपोलियनचा जुना शत्रु ब्रिटनचा चाणाक्ष सेनापती वेलस्ली कडे देण्यात आले. दोन्ही फौजा वाटर्लु येथे भिडल्या या निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा पुर्ण पाडाव झाला. नेपोलियनला पुन्हा अटक होउन या वेळेस अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर स्थानबद्ध करण्यात आले. तेथेच त्याचा १८२१ मध्ये मध्ये आजारपणामुळे म्रुत्यु झाला. नेपोलियनच्या म्रुत्युमागे अनेक रहस्य आहेत असे समजले जाते. त्यातील एक म्हणजे त्याला अर्सेनिक चे हळुवार विष देण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्याचा मृत्यु झाला असे काहिंचे म्हणणे आहे.

लहानपण व सुरुवातीचे दिवस

नेपोलियनचा जन्म भूमध्य समुद्रातील कोर्सिका बेटावरील अयात्सियो येथे १५ ऑगस्ट १७६९ रोजी झाला. त्याचे नाव त्याच्या मोठ्या भावाच्या नावावरुन ठेवण्यात आले. १७७० मध्ये कोर्सिका द्विप फ्रेंचाच्या ताब्यात आले. नेपोलियनचे घराणे कुठल्याही प्रकारे लष्करी परंपरेचे नव्हते व तसेच फ्रेंचही नव्हते. बोनापार्ट घराणे हे कोर्सिकन मानले जायचे ज्याची मुळे इटालियन होती. परंतु कोर्सिकामधील श्रीमंत व मानाचे होते. त्याचाच फायदा नेपोलियनला फ्रांन्स मध्ये आल्यावर लष्करी शाळेत प्रवेश घेताना झाला.१७८४ मध्ये लष्करी शिक्षण पुर्ण झाल्यावर फ्रान्सच्या सर्वोच्च लष्करी अकादमी मध्ये प्रवेश घेतला. नेपोलियनला गणित व भूगोलात खूप गति होती. त्याचे ऍतिहासिक लष्करी मोहिमेंचे ज्ञान सर्वांना अचंबित करणारे होते. त्याने तोफखान्यामध्ये विषेश प्राविण्य मिळवले.
१७८५ मध्ये अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर फ्रेंच लष्करामध्ये त्याची सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ति झाली. सुरुवातिच्या काळात त्याची जवाबदारी लष्करी चौकिवरील अधिकारी म्हणून होती. फ्रेंच राज्यक्रांतिच्या काळात नेपोलियन कोर्सिकामध्ये होता. नेपोलियनने या क्रांति मध्ये कोर्सिकामध्ये जॅकोबियन गटाला साथ दिली. त्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली व त्याने क्रांतितील स्वयंसेवकांचे नेतृत्व केले. कोर्सिकामधील परिस्थिती नेपोलियनसाठि बिकट बनली व त्याला मुख्य फ्रांन्समध्ये पळुन यावे लागले. फ्रान्समध्ये परतल्यावर नेपोलियनचे लष्करी कारकीर्द खर्‍या अर्थाने चालु झाली. निकटवर्तीयाकडुन त्याला तुलाँ येथील बंडखोरांविरुद्ध आघाडीची कामगीरी मिळाली. यातील यशामुळे नेपोलियनची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. या प्रयत्नात तो जखमी पण झाला होता. यानंतर नेपोलियनने आघाडीच्या क्रांतिकारकांबरोबर आपले हितसंबध वाढवले.
१७९५ मध्ये नेपोलियन पॅरिसमध्ये होता जेव्हा राजेशाही समर्थक व क्रांतिकारकामध्ये सशस्त्र उठाव झाला. राजेशाही समर्थकांना राष्ट्रिय ठराव उलथुन टाकायचा होता. ह्या वेळेस नेपोलियन ने बजावलेल्या कामगीरी मुळे बंडखोरांचा कणाच मोडुन काढला व नेपोलियन खर्‍या अर्थाने फ्रान्समधील प्रभावशाली लष्करी अधिकारी म्हणून गणला जाउ लागला. यानंतर नेपोलियनचे जोसेफिन शी लग्न झाले.

 इटलीतील पहिली मोहिम

इटली पहिल्या मोहिमेमुळे नेपोलियनचा दरारा वाढला. या मोहिमेनंतर त्याचे नाव ला पेटीट कापोरल (छोटा कार्पोरल) त्याच्या छोट्या चणीमुळे व युद्धभूमीवरील त्याच्या शौर्यामुळे पडले खासकरुन आर्कोल च्या पुलावरील लढाईत त्याने दाखवलेले शौर्याने संपुर्ण फ्रेंच सेना प्रेरित झाली व अक्षरशः पराभवाच्या खाईतुन विजयश्री खेचुन आणली. त्याने वाटेमध्ये लोबार्डि येथे ऑस्ट्रियन्स चा पराभव केला. व पुढे इटली मध्ये रोम पर्यंत जाउन धडकला व फ्रेंच राज्य कर्त्यांच्या आदेशाविरुद्ध जाउन त्याने पोपला राज्यकारभारतुन निलंबित केले. त्यानंतर १७९७ च्या सुरुवातीला ऑस्ट्रियावर हल्ला चढवला व त्यांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे इटलीच्या उत्तर भागावर पुर्णपणे फ्रेंचाचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर व्हेनिस वर आक्रमण करून त्यांना शरण येण्यास भाग पाडले व व्हेनिसची हजार वर्षे चालत आलेला एकछत्री अंमल संपुष्टात आणला. १७९७ च्या अंतापर्यंत नेपोलियन ने अनेक छोटे मोठे भाग फ्रेंच हद्दीत आणले. अश्या प्रकारे इटलीच्या मोहिमेने नेपोलियनची युरोपवर सद्दी चालु झाली ज्याचा प्रभाव संबध युरोपवर पुढील दीड दशक राहिला.
नेपोलियनने या मोहिमेने दोन मुख्य गोष्टी साध्य केल्या त्या म्हणजे सैन्यामध्ये नेपोलियन या नावाची जादुई पकड व अनेक राज्ये काबीज केल्यामुळे फ्रेंच राज्यकारभारात वरचष्मा.

No comments: